Saturday, September 22, 2012

brahmaputra flood

                

काल विजय स्वामींशी दूरभाषवर  बोलत होतो . विजयजींशी बोलताना  मागे छप्पर फाडणारा पावसाचा आवाज येत होता . गेले १० दिवस अरुणाचल , असम मध्ये मुसळधार पाऊस चालू आहे. रोइंगमध्ये देवपानीला पूर आहे . इंताया पब्लीक स्कूलपासून देवपानी नदीकडे गेल्यावर रोइंगच्या दिशेने नदी मोठ्या प्रमाणावर डोंगर कापत आहे. नवीन बांधण्यात आलेला हायवे वाहून गेला आहे . अंनिनीला जाणाऱ्या रस्त्याचे नुकसान झाले आहे. रोइंग ते इदुली , रुक्मो रसत्या वरचे बरेच कलव्हRरट वाहून गेले आहेत .रोइंग ते तेजू आणि तिनसुकिया ते तेजू रस्त्याचे पण बरेच नुकसान झाले आहे.
दिबृगडमध्ये ब्रह्म्पुत्रेचे पाणी पसरले आहेत. यावर्षी मे महिन्यात अभ्यास दौऱ्याच्या वेळी आम्ही संपूर्ण केंद्र विद्यालय मध्ये त्रिमितीची किमया : भौमितिक प्रतिकृती तयार करण्याची ३ शिबिरे घेतली होती त्याशाळेत पाणी आले आहे. शाळेचे बसेमेट पाण्यात आहे. प्राचार्य सुरेशसर पहिल्या मजल्यावर राहत आहेत. मी काळ सुरेशसरांशी आणि रवी सावदेकर सरांशी बोललो , रविजी विवेकानंद केंद्र विद्यालय , दिबृगडचे प्राचार्य आहेत. केंद्र शाळे समोरच्या रस्त्यावर पाणी आहे.
महाराष्ट्रातील वृत्तपत्रात व बातम्याच्या वाहिन्यावार याबद्दलचे काही वृत्त नाही . फोटो व अधिक तपशीलासाठी खालील लिंक पहा : 
http://www.arunachaltimes.in/local%201.html
http://www.assamtribune.com/scripts/detailsnew.asp?id=sep2212/at07
http://www.rediff.com/news/report/assam-flood-situation-worsens-relief-operations-underway/20120921.htm 

I received these pictures from Arunachal 

a) Glimpse of Alubari,way to tezu....

 
b) People from 32 miles being rescued from flood trodden area with the help of army.

 

No comments:

Post a Comment