Wednesday, February 26, 2014

Coaching for UPSC, APPSC aspirants conducted

Coaching for UPSC, APPSC aspirants conducted
ITANAGAR, Feb 24: The seven days coaching for UPSC and APPSC aspirants conducted by Seva Bharati in collaboration with Jnana Prabodhini Pune concluded at IGG College, Tezu today.
A total of 20 students have benefited from the coaching.
The closing ceremony was attended by the principal in-charge of the college, the organizing secretary Arunachal Vikash Parishad.

http://www.arunachaltimes.in/feb14%2025.html 

Coaching programme for competitive exam held
Correspondent
ROING, Feb 25:  A one day coaching programme led by experts from Jnana Prabodhini, Pune to prepare students for various competitive examinations was held here today. Jnana Prabodhini is reputed in the country for producing IAS officers through its able training and guidance.
The coaching programme held at the newly inaugurated Career Counselling cum SSA Training Center was organized by the district administration in support with Research Institute of Worlds Ancient Tradition Culture Heritage (RIWATCH), Roing.
Speaking as Chief Guest, Wangnot Tikhak, Additional Deputy Commissioner (ADC) said there was no short cut to success and hard work is the only way to achieve it.
A total of 50 students from Intaya Public School, VKV, government schools and colleges enrolled for the coaching programme.
"The students are given free coaching to appear for competitive examinations to be conducted by the state public service commission and UPSC," informed Rokom Tayeng, District Labour and Employment Officer (DLEO) cum in-charge, Career Counselling Centre.
He encouraged the students to avail the coaching facility and to make best use of it in preparing oneself for their future career. "Today's coaching programme is the first career counselling programme to be organized by the centre, and we hope to have good beginning," said Tayeng.
Earlier welcoming the participants, Vijay Swami, Executive Director said that there are many factors to be considered when choosing a successful career. "The foremost being the aptitude, and while one may be able to do anything when they put their mind into, but that doesn't mean one will be able to do it well."
He informed that the centre in collaboration with RIWATCH will be conducting classes on aptitude training that will help the students to perform better in examinations.
The experts from Jnana Prabodhini to attend the programme were - Swapnil Digalwar, Aniruddha Dhage and Omkareshwar Khanchangire.

 http://www.arunachaltimes.in/feb14%2026.html

Wednesday, January 29, 2014

अभ्यास सहली योजताना ........








स्व अभ्यासाची  सूत्रे

स्वाध्याय एक : 

डॉ. लुईस लीके जीवाश्म आणि मानववंश शास्त्राचा अभ्यास करणारे संशोधक आफ्क्रिकेत काम करत होते. त्यांनी एक नवीन विषय अभ्यासासाठी घ्यायचे ठरवले. आफ्रिकेत गोरिला , ओरन्गउट्टाण, चिम्पान्झी या कपि प्रकारची वानरे सापडतात. मानवाला जवळचे असणारया चिम्पान्झीचा अभ्यास करायचे त्यांनी ठरवले.अभ्यासासाठी त्यांनी विद्यार्थी निवडायचे ठरवले . या विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती देण्यात येणार होती. मुलाखतीसाठी अनेक विद्यार्थी आले होते . कोणी प्राणीशास्त्रात पदवी मिळवली होती, काहीजण संशोधन करत होते . या मुलाखतीसाठी एक मुलगी आली होती . तिने प्राणीशास्त्रात पदवी देखील मिळवली नव्हती तरी डॉ. लुईस यांनी तिची अभ्यासासाठी निवड केली . पुढे ती मुलगी आफ्रिकेतील घनदाट जंगलात राहिली , नव्हे चिम्पान्झीन्बरोबर राहिली. तिने चिम्पान्झीन्बद्दल आश्चर्यकारक माहिती जगासमोर आणील. गेली पन्नास वर्ष ‘जेन व्हान लाविक गुडल ‘ चिम्पान्झींचा अभ्यास करत आहे. आज जेन चिम्पान्झीसाठी अभयारण्य निर्माण करत आहे. जेनाने चिम्पान्झींचा अभ्यास कसा केला , आफ्रिकेच्या घनदाट जंगलातून ती कशी हिंडली , जंगल वाचायला कशी शिकली , जीवावर बेतणाऱ्या प्रसंगांना कशी सामोरी गेली याची सविस्तर कथा नँशनल जिओग्राफीक मासिका वा चँनलच्या वेब साईट वर जाऊन सविस्तार वाचा. जेनला जेव्हा तिच्या संशोधनाबद्दल प्रसिद्धी मिळाली तेव्हा डॉ. लुईसना जेनची अभ्यासासाठी निवड का केली असे विचारले असता डॉ. लुईस म्हणाले की जेनचे प्राणीशास्त्राचे ज्ञान इतर विद्यार्थां पेक्षा कमी होते पण मला जेनमधील प्राण्याबद्दलची आवड , प्राण्याबद्दलचे प्रेम दिसून आले म्हणून जेनची चिम्पान्झींचा अभ्यास करण्यासाठी निवड केली. जेन लिहिते ‘ मला लहानपणापासून निसर्गात मुक्त आवस्थे प्राणी कसे राहतात , कसे जगतात याबद्दल कुतूहल होते. त्याच्या जीवनाची माहिती मिळवण्यासाठी अभ्यास करण्याची माझी तयारी होती. चिम्पान्झी माझ्याशी बोलतील ऐव्हडे त्यांच्या जवळ जाण्याची माझी इच्छा होती.’

मित्रांनो , आपण जेव्हा अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा प्रथम त्या अभ्यास विषयाबद्दल आपल्या मानत प्रेम पाहिजे ,आवड पाहिजे तरच अभ्यासाला सुरुवात होते .आपल्या आवडीचा विषय शोधता आला पाहिजे . आवड शोधण्यासाठी अनेक विषयांचा अभ्यास करून बघावा  लागेल . अनेक विषयांचा परिचय होइल तेव्हा मनापासून आपण अभ्यास करु शकू असा  विषय सापडेल . अभ्यासाची इच्छा /उत्सुकता/गरज  आपल्या मनामध्ये आपणच निर्माण करायाल हवी तरच अभ्यासाला सुरुवात होते . आईवडील ,शिक्षकांनी सांगितले म्हणून तुम्ही अभ्यास करता का मला अभ्यास करायची इच्छा आहे , मला विषय आवडतो म्हणून मी अभ्यास करतो हे अभ्यास करताना सर्वात महत्वाचे आहे. 

स्वतःच्या इच्छेने अभ्यासाला सुरुवात केलीत तर अभ्यासाचे तंत्रमंत्र तुम्हाला सांगता येतील ;नव्हे एकलव्याप्रमाणे तुम्हीच ते शोधून काढाल .



स्वाध्याय दोन : 

मित्रानो , कधीतरी सिंहगडावर जाऊन आला असालना, पायी गड चढताना चांगलेच दमायला होतेना ! पण पण मजा येते.माझ्या सोलापूरच्या शाळेतील विद्यार्थांच्या चेहऱ्यावर तर सिंहगड ,राजगड चढाई केल्यावर एव्हरेस्ट चढाई केल्याचा भाव असतो. 

एकदा पुण्यात सलग सिंहगड चढण्याची स्पर्धा योजली होती . पुण्यातील अनेक युवक त्या स्पर्धेची कसून तयारी सराव करत होते. वर्तमान पत्रातील स्पर्धेची बातमी वाचून पुण्यात शिकायला आलेला अरुणाचल प्रदेशातील मित्र ‘ताकेलूम’ गंमत  म्हणून स्पर्धा पाहण्यासाठी गेला . सिंहगडचा पायथ्याशी गेल्यावर गंम्मत म्हणून ताकेलूमने स्पर्धकांबरोबर सिंहगड चढायल उतरायला सुरुवात केली . आश्चर्य मंजे सराव केलेले स्पर्धक थकून बाद झाले पण ताकेलूमने सिंहगड सलग चढण्याची स्पर्धा जिंकली . विक्रम त्यांवर नोंदवला गेला व लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये त्याचे नाव नोडवले गेले. 

गेल्या वर्षी मे महिन्यात मी अरुणाचल प्रदेश मध्ये गेलो होतो . तेथील एका दुर्गम खेड्यातील मुलगी
‘टिने मेना’  एवरेस्टवर चढाई करून आली होती.

माझे सोलापूरच्या शाळेतील विद्यार्थी , ताकेलूम आणि  टिने मेना यांच्यात तुम्हाला काय साम्य फरक  जाणवतो ? सर्वांच्या जन्मजात शारीरिक क्षमता समान आहेत पण ताकेलूम आणि  टिने मेना अरुणाचल सारख्या हिमालयातील पहाडात राहिल्याने त्यांच्या डोंगर चढण्या साठीच्या क्षमता सोलापुरसारख्या सपाट मैदानी क्षेत्रात राहणार्यांपेक्षा विकसित झाल्या आहेत.
आपण ज्या नैसर्गिक, कौटुंबिक  व सांस्कृतिक वातावरणात राहतो त्याप्रमाणे आपल्या काही क्षमता व कौशल्ये परिसराच्या संसारामुळे नकळत विकसित होतात. ज्याच्या घरी वाचनाचे वातावरण आसते त्याचे वाचन चांगले असते  किमान ती बहुश्रुत असतात , ज्यांच्या घरी दुरुस्ती देखभालीचे काम चालेते त्याला दुरुस्तीचे ज्ञान सहज होते,  घरचे दुकान असेल तर त्याचे संवाद कौशल्य अपसूक विकसित होते.  

आता ताकेलूम एव्हरेस्टवर का जाऊ शकला नाही आणि  टिने मेना एव्हरेस्टवर का सर करू शकली याचा विचार करू . दोघेही पहाडात राहणारे एकाच प्रदेशातील आहेत , पार्श्वभूमी समान आहे पण डोंगरात राहतो म्हणून डोंगर चढणे आणि एवरेस्ट चढणे यात फरक आहे . गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घ्यावे  लागते, नियमित सराव करावा लागतो. मनात पराक्रम करण्याची इच्छ्या प्रथम असावी लागते , त्याला प्रशिक्षण ; कौशल्य विकसन व सरावाची जोड द्यावी लागते.

मित्रांनो, अभ्यास करण्यासाठी नुसते हुशार असून भागात नाही तर प्रथम अभ्यासाची इछ्या/आवड  असावी लागते . नुसती आवड असून भागात नाही तर अभ्यास कसा करायचा याचे तंत्रमंत्राचे अवगत व्हावे लागतात त्याचा सराव करावा लागतो. असा अभ्यास कसा करायचा याचे प्रशिक्षण घेऊन जो सराव करतो तोच परीक्षेचा एव्हरेस्ट सर करून यश मिळवू शकतो.
            अभ्यासाचे तंत्रमंत्र जाणून घेतल्याने तुम्ही अभ्यासातील अडथळे दूर करून अभ्यासाची परिणामकारकता वाढवू शकाल

स्वाध्याय तीन : 

स्वाध्याय एक आणि दोन मध्ये स्वयं अध्ययनातील ‘ स्व’ चा विचार आपण केला . स्वाध्याय तीन मध्ये अभ्यासाचा  एव्हरेस्ट चढण्याचा निश्चय झाल्यावर  काय करायचे याचा विचार करू. 
मित्रांनो, तुम्ही एकविसाव्या शतकामध्ये शिकत असणारे विद्यार्थी आहात. संगणक , इंटरनेट सारखी साधने तुम्हाला अभ्यासासाठी उपलब्ध होत आहेत. ज्ञानाच्या कशा विस्तारत आहेत , इंटरनेट च्या माध्यमातून माहिती सहज उपलब्ध होत आहे. पण प्रगतीची गती दिवसेंदिवस वेगवान होत चालली आहे . अश्यावेळी शिकण्याचा अर्थ समजून घेऊन शिकणारेच पुढे जातील. महत्व येणार आहे किती पाठ आहे यालानाही तर माहितीवर प्रक्रिया करता येतेकी नाही याला . महत्व येणार आहे ते किती समजले,समजलेले वापरता  येणे व  प्रश्न सोडवता येणे याला . शाळेतील शिक्षकांपलीकडचे मार्गदर्शक आपल्याला उपलब्ध झाले आहेत . त्यामुळे नियोजन बद्ध अभ्यास करण्या साठी ‘ शिकायचे कसे ते शिकण्याचे’ (Learning to learn) महत्त्व वाढत जाणार आहे. त्यासाठी ‘स्वयं अध्ययन कौशल्ये’ शिकणे महत्वाचे आहे. 

तुम्ही अभ्यास करता म्हणजे  काय करता ? एखादी संकल्पना तुम्हाला समजली आहे हे तुम्हाला कधी व कसे समजते ? शाळेत , क्लासमध्ये तुम्ही शिकता , पाठ्य पुस्तके वाचता , तयार नोट्स, गाईड, नवनीत वाचता , प्रश्नोत्तरे घोकं पट्टी करून; पाठ करून परीक्षेत लिहिता आणि गुणही मिळवता. पण एवढे करणे म्हणजे परिपूर्ण अभ्यास करणे नाही. कदाचित शालेय वयात हि पद्दत परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उपयोगी पडेल पण महाविद्यालयात आणि विद्यापिठात उच्य शिक्षण घेण्यासाठी हि पद्धत कुचकामी ठरेल म्हणूनच स्वतचे स्वतः शिकण्याची हि ‘ स्वयं अध्ययनाची ‘रीत , त्यातील कौशलये व तंत्रे समजून घायला हवीत.

अभ्यास कौशल्ये : 

चांगला अभ्यास करण्यासाठी चांगले वाचन करता येणे आवश्यक आहे म्हणजे  तुमची वाचनाची गती उत्तम असायलाच हवी पण तुमची समज पण उत्तम असायला हवी. अभ्यासासाठी वाचन, लेखन , निरीक्षण , श्रवण, स्मरण , पाठांतर , टिपणे (नोट्स) काढणे यासारखी कौशल्ये शिकावी लागतील .

माहिती कौशल्ये : 

माहितीच्या युगात माहित शोधता येणे व माहितीवर प्रक्रिया करता येणे महत्वाचे आहे. शब्दकोष ;ज्ञानकोश ; विश्वकोश वापरता येणे ,ग्रंथालयात संदर्भ शोधता येणे महत्वाचे आहे. इंटरनेट वर माहित , चांगल्या वेब साईट शोधता येणे , माहिती साठवता येणे , चांगल्या मित्रांच्या  ;अभ्यासकांच्या गटाच्या संपर्कात राहणे ,त्याचे सभासद बनणे. 

अभ्यास पायऱ्या : 

एखादी संकल्पना समजून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिता येणे व पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी अभ्यास टप्याटप्याने करावा लागतो. प्रथम विषयाचे व परीक्षेचे स्वरूप जाणून घ्या (survey), विषय उत्तम समजण्यासाठी जास्तीजास्त प्रश्न  विचारा (Questioning & understanding) , त्यासंकल्पानेबद्दल जे जे साहित्य संदर्भ उपलब्ध असेल ते मिळावा व वाचा (reading), वाचनानंतर त्याची टिपणे काढा ,टिपणातील सारशब्द शोधून सूक्शम टिपणे; तक्ते ,संकल्पना चित्रे तर करा (writing &information processing ), महत्वाची माहित स्मरणात ठेवा (remember), स्मरण केलेले ;पाठ केलेले आठवण्याचा सराव करा (recall) , उजळणी करा (revision), प्रश्न प्रकारानुसार परीक्षेत उत्तारची मांडणी कशी करणार ते निश्चित करा आणि प्रश्न पत्रिका सोडवण्याचा सराव करा (representation).
वरील SQ5R या पाच पायरयातून संकल्पनेचा प्रवास झाला तर परीक्षेतील यश तुमच्या पदरात नक्की पडेल. 


नियोजन :

 इंग्लिशमध्ये ऐक विचार आहे “ If you fail to plan you plan to fail”. अभ्यास आपण विशिष्ट हेतू डोळ्या समोर ठेऊन करत असतो . त्यामुळे नियोजनाची पहिली पायरी म्हणजे हेतू /उद्दिष्ट नेमक्या शब्दात मांडणे. उद्दिष्ट ठरवले तर उद्दिष्ट सध्या करण्याच्या प्रेरणेने अभ्यास जोमाने होइल.नेमके , मोजता येणारे , आव्हानात्मक उद्दिष्ट ठरवावे. त्याचे टप्पे मांडावेत म्हणजे नियोजित उद्दिष्टाच्या दिशेने प्रयत्न केले जातील. उद्दिष्टा पर्यंत पोचण्यासाठी त्याला वेळेच्या नियोजनाची व अभ्यासासाठी लागणाऱ्या साधनांच्या नियोजनाची जोड द्यावी लागेल. साधनाच्या नियोजनात पुस्तके , अभ्यास साहित्य , अभ्यास मार्गदर्शक  , खर्च आदीचा विचार करावा .
 वेळेच्या नियोजन करता येणे व ते पाळता येणे सर्वात महत्वाचे . शाळेचे वेळापत्रक, अभ्यासक्रम  ,घराचे कार्यक्रम ,सन समारंभ , आपले छंद आदींचा विचार करून वार्षिक/सत्र/मासिक/ नियोजन , साप्ताहिक नियोजन व दैनंदिन नियोजन असा विचार करावा . नियोजन लवचिक तरीही उद्दिष्टाकडे नेणारे असावे. 


‘स्व’ नियोजन : 

अभ्यासाची परिणाम कारकता सर्वाधिक कशावर अवलंबून असेल तर  ‘स्व’ नियोजनावर. ‘स्व’ नियोजनासाठी आधी स्वतःच्या क्षमता ;मर्यादांचे भान,जबाबदारीची जाणीव निर्माण झाली पाहिजे. आपले आवडते विषय; नावडते विषय , आपली अभ्यासाची शैली , आपल्या अभ्यास सवई माहित होणे गरजेचे आहे.  ‘स्व’ नियोजनात आपल्या परिसरातील बह्याघटकांचे नियोजन जसे अभ्यासाची जागा, टीव्ही करमणुकीसाठी कितीवेळ देणार , टाईम पास /गप्पासाठी कितीवेळ आदीचा विचार केला पाहिजे.   अभ्यासाची परिणाम कारकता वाढवण्यासाठी निरोगी शरीर , युक्त आहार विहार, विश्रांती, झोप  महत्वाचे आहेत.  दिवसाच्या सुरुवातीला  दिवसातील कामे , आपल्या अभ्यासाची गुणवत्ता याबद्दल चिंतन करण्यासाठी ५ मिनिटाचा वेळ ध्यानासाठी /चिंतनासाठी राखून ठेवावा. शांतजागी ,प्रसन्ना वातावरणात स्वस्थ बसून स्वतःच्या उद्दिष्टान्बद्दल ,प्रगतीबद्दल स्वतःशीच बोलावे, संवाद करावा.



_------------------------------------------------------------------------------------------------------------------
  
 अभ्यासातील स्वावलम्बनातून यशाचा वेध घ्याचा असेल तर वरील तीन स्वाध्यायावर चिंतन करा . 
अभ्यासाची विविध कौशल्ये ,तंत्रे व पद्धती यांचा परीचय  करुन घ्या , त्यांचा सराव करून त्यावर प्रभुत्व मिळावा . 

अभ्यास करताना ऐक विचार सतत समोर ठेवा ‘Start where you are ,with what you have ,Make some thing of it and never be satisfied.’ 

मनापासून नियोजन पूर्वक अभ्यास करून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा . 

यश तुमचेच आहे. 


Monday, January 13, 2014

नमस्कार,

विवेकानंद केंद्र विद्यालय , दिब्रुगड चे प्राचार्य श्री. रवींद्र सावदेकर यांना गेल्या आठवड्यात पुण्यात नातू फौंडेशनचा सेवाव्रती पुरस्कार देवून गौरवण्यात आले. पुरस्काराबद्दल श्री. रवींद्र सावदेकर यांचे अभिनंदन.
दिव्य मराठी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी सोबत देत आहे.






Saturday, December 7, 2013

सप्तरंगीत ज्ञान-सेतू आणि ‘सरहद को स्वरांजली’

                                                          सप्तरंगीत ज्ञान-सेतू


ज्ञान प्रबोधिनीच्या EARC विभागानेसुरुकेलेल्या ‘ज्ञान सेतू’ या उपक्रमा अंतर्गत पूर्वांचल मधील अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर जाण्याचा योग आम्हाला (सौरभ, रविराज, अश्विन आणि विनायक) मिळाला.
भारतातील चार विकसनशील राज्यातील (आसाम,अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि छत्तिसगढ)
 विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञानातील खेळण्याद्वारे पोहचून त्या भागाशी एक सेतू बांधणी करणे हा या उपक्रमाचा
उद्देश आहे.
आम्ही इटानगर मध्ये असतानाच तेथे एका भव्य-दिव्य अशा कार्यक्रमात सामील होण्याची संधी आम्हाला
मिळाली. १९६२ मधील भारत-चीन युध्द हे अरूणाचलच्या भूमीवर झाले. या युध्दात अनेक वीरांनी प्राण
पणाला लावून, प्रत्यक्षी प्राण अर्पून चीनशी लढा दिला. या युद्धात भारत हरला. पण अशावेळी भारताच्या
गानकोकिळा ‘लता मंगेशकर’ यांनी गायलेल्या ‘ये मेरे वतन के लोगो...’ या गाण्याने पुन्हा एकदा शक्ती आणि उत्साह सर्व भारतीयांना दिला. या सर्व घटनेला ५० वर्षे पूर्ण झाली. म्हणून संस्कार भारती या संस्थेने
तिथे ‘सरहद को स्वरांजली’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सरहद को स्वरांजली या कार्यक्रमात पूर्वांचल मधील सात राज्ये व सिक्कीम या आठ राज्यांचा सहभाग होता.

या तीन दिवसीय कार्यक्रमाचे मुख्य स्वरूप असे होते—

• दि.२२: ये मेरे वतन के लोगो... सामुहिक व व्यक्तिगत गायन स्पर्धा.
• दि.२३: पहाटे ५:४२ पासून दुसाऱ्या दिवशी पहाटे ५.४२ पर्यंत (२४ तास) आठ राज्यांचे संस्कृतीक कार्यक्रम.
• दि.२४: ये मेरे वतन के लोगो... गाण्याची सुमारे १००० विद्यार्थ्यांचे सामुहिक गायन व प्रकट कार्यक्रम.

आठ राज्यांतून आलेल्या अनेक छोट्या- मोठ्यांनी गायन स्पर्धेत सहभाग नोंदवला. ये मेरे वतन के लोगो... या
गाण्याने इंदिरा गांधी उद्यान व इटानगर हे भारावून गेले होते. संगीताच्या शक्तीने एक देशभक्तीची लहर तयार झाली होती. अरुणाचलच्या थंडगार हवेमध्ये देशभक्तीने एक उबदार वातवरण तयार झाले होते.
दि.२३ चा चोवीस तासांचा सांस्कृतिक कार्यक्रम हा संपूर्ण पूर्वांचलचा सुंदर संगम होता. सात रंगाच्या विविध
नद्यांनी एका ठिकाणी एकत्र आल्यावर जे सुंदर दृश्य असेल ते आम्हाला पहायला मिळाले. सात रंग हे फक्त
त्यांच्या रंगेबीरंगी दागिने व पोशाखांचे नाही तर भाषा, वाद्य, संगीत, विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि
वैचारिक देखील होते. या कार्यक्रमात भारतातील विविध प्रसिद्ध कलावंतांनी आपल्या कलेनी इटानगरला
मंत्रमुग्ध केले. त्यामध्ये प्रसिद्ध चित्रकार, गायक यांचा सामावेश होता. उस्ताद नाफिसुद्दिन डागर व त्यांचे
बंधूनी मिळून सर्व शहीद जवानांना आपल्या स्वरांनी स्वरांजली अर्पण केली.

शेवटच्या दिवशी म्हणजे दि.२४ ला प्रकट कार्यक्रमामध्ये सर्व बालकांचा चाहता ‘शक्तिमान’ म्हणजे मुकेश
खन्ना, अरुणाचलप्रदेशचे मुख्यमंत्री नाबाम तुकी उपस्थित होते. या कार्यक्रमात शक्तीमानने आपल्या वाणीने
सर्व विद्यार्थ्यांची मनं जिंकली आणि सर्व जवानांना कृतज्ञतेने श्रद्धांजली अर्पण केली. ९४ वर्षीय लीलावती या
शहीद जसवंत सिंगच्या आई या कार्यक्रमात उपस्थित होत्या. त्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानचिन्ह
देवून सन्मानित करण्यात आले. असे सन्मानचिन्ह सर्व शहीद जवानांच्या घरी पोहचावण्याचा उपक्रम
संस्कार भारतीने हाती घेतला आहे. याचवेळी १००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येवून सामुहिक ‘ये मेरे
वतन के लोगो...’ हे गीत गायले. व ३०० विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे एक शीर्षकगान कृतीगानातून सादर
केले.



या कार्यक्रमात विविध संस्थांचे स्टॉल लावण्याची संधी होती. आम्ही ‘ज्ञान सेतू’ चा देखील एक स्टॉल लावला
होता. विज्ञान कचऱ्यातून बनलेल्या खेळण्या पासून देखील शिकता येते. अशा खेळण्यातून, प्रयोगातून
मुलभूत वैज्ञानिक तत्व शिकणे अधिक आनंददायी असते याचा अनुभव लहान-मोठे सर्वजन घेत होते. या दोन
 दिवसात एक हजारापेक्षा अधिकांनी भेट दिली. कित्येकांनी हा उपक्रम त्यांच्या राज्यात, भागात घ्यावा असे
सुचवले. असे फक्त सुचवलेच नाही तर जबाबदारी घेण्यासाठी हात देखील पुढे आले. या दरम्यान स्पर्श करून
 जाणारा अनुभव म्हणजे लहान-मोठ्यांच्या चेहऱ्यावर येणारे आश्चर्य भाव व त्या जादुई खेळण्याच्या मागे
काही वैज्ञानिक तत्व आहे हे जाणल्या नंतर आकाशाला गवसणी घातल्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. या
स्वरांजलीच्या स्वरात भिजण्याची संधी मिळाली. ज्यांच्यामुळे आपण सर्व सुरक्षित राहून विकास साधू
शकतो, सहज अभिव्यक्ती करू शकतो अशा जवानांना कृतीशील, कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली अर्पण करण्याची
संधी आम्हाला मिळाली. जसा ‘ज्ञान सेतू‘ बाहेरच्या जगात बांधला गेला, व्यापक झाला. त्याचा प्रमाणे आत
 देखील आपण एका मोठ्या संस्कृतीचे, समाजाचे, तेथील प्रश्नांचे भाग आहोत...याचे देखील सेतू बंधन सुरु
झाले.


Friday, November 29, 2013

Sarhad ko Swaranjali


                                                     Sarhad ko Swaranjali



Nov 19, 7:02 pm


Itanagar, Nov. 19 (ANI): Ninety-year-old Leela Devi, the mother of martyred rif leman Jaswant Singh
Rawat, has said she would lead the Sharhad ko Swaranajali f unction at the Indira Gandhi Park here on
November 24.
Devi, accompanied by her relatives Vijay Singh Rawat, 58, Madhubala, 47 and Amit Rawat, 23, would arrive here on November 24 f rom Dehradun. They would f ly to Guwahati and a special helicopter would then bring them to Itanagar, according to organising committee president Kipa Babu.
Every word of the proud mother would be a louder message f or the soldiers serving the motherland in
harshest co ndition along the Indo-China border and boost their morale to continue their duty. It would be
rarest occasion when the mother salutes her brave son who sacrif iced his lif e 51 years ago.
Besides the proud mother of Rawat, who had changed the course of 1962 Chinese aggression by halting
the advance of Chinese soldiers f or 72 hours bef ore sacrif icing his lif e, Shaktiman f amed Mukesh Khanna,Lt Gen (retd) G M Patil who was posted in Tawang during the war, f lutists Rajendra Prasanna and PanditKetan Joshi, besides Chanaykya serial producer Chandra Prakash Dwivedi, Hindustani classical exponent Nagraj Havaldar, Dagar Bandhu Nasif f udin and Hanif uddin, painter and singer Satya Narayan Maurya, Manipuri bamboo dance expert Gauri Kishore Sarma, Bhojpuri singer Manoj Tiwari, world-known portrait expert Basudev Kamat and cine artist Pranjal Saikia, 600 representatives f rom seven north east states, about 10,000 locals, including 400 dancers and singers of host state would take part in the mega event to begin at 10. 30a.m. to pay rich tributes to the brave hearts who had sacrif iced their lives while guarding the f rontier.
'Ae Mere Watan Ke Logon', the chorus by 10,000 students would rent the air besides numerous patriotic
programmes as part of the event, organised by Sanskar Bhrati Poorvotar.
______________________________________________________________________________________



ITANAGAR, Nov 24:
Arunachal Pradesh is the nation's “sentinel of the east”, and its people are patriotic and “jealously guarding
the territorial integrity of the country”, Chief Minister Nabam Tuki said today.
“Sitting on the lap of the Himalayas, we are the f irst to resist any f orce against India. If any enemy eyes
India through North East, Arunachal Pradesh will stand against it f irst, like in the 1962 Sino-India war,” he
told the valedictory programme of the three-day 'Sarhad ko Swaranjali' organized by North East unit of
Sansakar Bharati at Indira Gandhi Park here.
Tuki announced that the Government would set-up a Martyrs’ Memorial in the state capital Itanagar in
memory of those soldiers killed while f ighting the invading Chinese army in 1962. He said Itanagar, which
was established as the state capital af ter 1962, owes its respect to the Martyrs who sacrif iced their lives
f or the sovereignty of the country and territorial integrity of Arunachal Pradesh.
Tuki paid rich tributes to the martyrs of the 1962 war and acknowledged the exemplary services rendered by
the Indian soldiers along the international boundaries that the state shares with neighboring countries. He
remembered martyr Jaswant Singh Rawat, hero of the Indo-China war, as a true son of the soil and said
Arunachal Pradesh as well as the whole country will always remain gratef ul f or his ultimate sacrif ice.
Felicitating wheel-chair bound Leela Devi, 94- year-old mother of martyr Jaswant Singh, who came all the
way f rom Dehradun to attend the programme as the Chief Guest, Tuki expressed gratef ulness on behalf of
the people of the state.
“Your setting f oot on the soil of Arunachal Pradesh has f urthered the sanctity of the land of the dawnlitmountains,where your brave son laid down his lif e f ighting the enemy. I salute the mother, who sacrif icedher beloved son f or this land,” he said.

Friday, November 8, 2013

Bharat Mera Ghar



Bharat Mera Ghar
Bharat Mera Ghar , a tour programme for teachers from Arunachal Pradesh was successfully concluded at Guwahati  on 8th November, 2013. As a part of National Integration, some of our Arunachalee brothers and sisters used to go to other states and experience all-round development of the states every year through a tour programme named Bharat Mera Ghar (B.M.G.).
This year B.M.G. was organized for teachers specially to study various educational experiments done in Maharashtra. A group of 23 teachers from 9 districts of Arunachal Pradesh visited Mumbai, Pune and Nagpur from 28th October to 8th November, 2013.
The group first reached to Mumbai where they get a warm welcome from Mumbaikars. The group visited Elephanta caves, Pagoda, Gateway of India and Juhu beach. The teachers visited Keshav Srushti where they learnt about medicinal plants, what type of project s the students used to work on.
 At Pune, a training programme was organized at Jnana Prabodhini, a reknown Institute working on gifted children. Sessions on Geography and History by Dr.Manoj Devane helped the group to clear the basic concepts as well as various tools and methodologies which should be used by taking benefits of local surroundings.     Heritage walk,  a morning walk in Central Pune conducted by Shri. Mohan Shete brought back the live memories of freedom fighters like Veer Savarkar, Lokmanya Tilak, Chaphekar Bandhu, Hutatma Rajguru, M.N. Roy by visiting their residences. At ‘Bharat  Itihas Samshodhan Mandal’, the teachers recognized the importance of keeping History in written form.
The group was also trained in Play-way methods, Child psychology, enhancing intelligence through games and communication skills for teachers by Dr.Sujala Watve , Dr.Vanita Patwardhan and faculty members of Jnana Prabodhinin’s Institute of Psychology .
The group gained an advantage of sharing and discussing ‘Educational Scenario’ in Arunachal Pradesh for 3 days with Shri.Vishwas Lapalkar, Life worker of Vivekananda Kendra  and Vivek Ponkshe, Secretary, Educational wing of Jnana Prabodhini .Both  Vishwasji and Vivekji have  long association with educational and  development  activities in Arunachal Pradesh .
 Lastly, the group visited the RSS headquarter at Nagpur where the group visited the birthplace of Dr. Keshav Hedgewar. The group also visited social projects run by RSS and its sister organizations like Hedgewar Blood Bank, Goshala Prakalp, Vivekananda Hospital run at tribal belt in Maharashtra. By seeing the Goshala Prakalp, the group came to know the number of medicinal uses of Gomutra as well as why our culture believe cow as ‘Gomata’. The group also visited ‘Dikshbhumi ‘where they saw the photo gallery of Dr. Babasaheb Ambedkar. 
Each teacher went to different houses for lunch and to celebrate Diwali Festival at Pune and Nagpur. In all, the group feels the tour educative, entertaining, and experiencing and Country loving Tour. The group feel it proudly Bharat Mera Ghar.


Bharat Mata Ki Jay !!