Namaskar,
A group of Jnana Prabodhini Youth Volunteers visited Nagaland in month of February .
The group conducted science camps around Jaluki, Tening and Mokukchong.
Here is an article about the visit.
Pravin Prayag coordinated the visit. (pravin_prayag@yahoo.com, )
Prashant
Nagaland , नाव घेताच मनात भरपूर उत्सुकता , थोडी भीती जागृत होते. त्यामुळेच पोंक्षे सरांनी जेंव्हा Nagaland मध्ये विद्यान शिबीर घेण्याचा प्रस्ताव ठेवला तेंव्हा आम्ही ८ जण उत्साहात तयारी ला लागलो . मुलांना वर्गात अवघड, कंटाळवाण्या वाटणाऱ्या विज्ञानाच्या संकल्पना खेळण्यांच्या , प्रयोगाच्या माध्यमातून पोचवायच्या असा या शिबिरांचा उद्देश होता . वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते श्री केदार कुलकर्णी यांच्या मार्फत तेशील गावांचा संपर्क झाला. ब्रिटीश काळापासून Nagaland मध्ये जाण्यासाठी ILP (Inner Line Permit ) घ्यावं लागत . एकूण नागा जमातींच्या(tribe) संख्या ३९ असली तरी Nagaland मध्ये त्यापैकी १७ जमाती राहतात. एका जमातीतल्या लोकांना दुसऱ्या जमातीची भाषा कळत नाही , आता मात्र नागमीस नावाची एक भाषा सर्व Nagaland मध्ये चालते. हे राज्य डोंगरात वसलं आहे त्यामुळे दिमापुर पासून सुरु झालेले घाट उतरण्यासाठी परत दिमापुरातच याव लागत. येथे आम्ही दोन गटात विभागालो .
एका गटाने पेरेन भागात दिमापुर, ओल्ड तेसन , तेनिंग आणि जालुकी अश्या ४ ठिकाणी शिबीर घेतली . या भागा मध्ये झेलीयांग हि स्वधर्मी ( indigenous faith )जपणारी जमात राहते . १९ लाख लोकसंख्येच्या या राज्यात फक्त तीन हजार स्वधर्मी उरले आहेत. "हरक्का " संघटना हि indigenous faith जपण्यासाठी प्रयत्न शील आहे. निसर्गपूजक असलेल्या गावामधील लोकांनी आमचं मनापासून स्वागत केलं. आम्ही आलो म्हणून खास शिकार केली गेली ! आम्ही तर स्थानिक वेश परिधान करायची हौस भागवून घेतली! चारही गावांमध्ये मुलांचा प्रतिसाद खुप छान होता . प्रत्येक शिबिरात साधारण १०० विद्यार्थी असायचे. सुरुवातीला येथे देखील काम करणं धोक्याचं होतं .पण आता परिस्थिती बदलत आहे . आमचं शिबीर पाहायला गाव-बुडा (सरपंच , गाव सभेचा मुख्य ) देखील आला होता .अश्या प्रकारचं शिबीर गावाने पहिल्यांदाच अनुभवलं . आम्ही घेत असलेली गाणी पाहून ओल्ड टेसन गावातील मुलीनी नागा नृत्य सादर केलं!
दुसऱ्या गटाने विस्वेमा , तेसोफेन्यू आणि मोकोकचुंग या गावांमध्ये शिबिर घेतली . या भागात पूर्णपणे ख्रिश्चन लोकवस्ती आहे . मध्ययुगीन युरोप प्रमाणे गावातील लोक उत्पनाचा काही भाग चर्चला कर म्हणून देतात . प्रत्येक गावात असलेल्या विद्यार्थी संघटनांनी विज्ञान शिबीर आयोजित केलं होतं . कॅथलिक स्कूल , Baptist स्कूल आणि Government स्कूल अश्या तीन शाळातील साधारण ४० मुल शिबिरात आली . सुरुवातीला खूप लाजरी बुजरी असलेली मुला एकदा प्रयोगातली गम्मत कळाली की छान खुलत होती . मुळातच इथल्या मुलांचा स्वभाव थोडासा लाजाळू आहे...पटकन बोलणार नाहीत. कळले तरी सांगणार नाहीत. एका शिबिरात मधल्या सुट्टीच्या दरम्यान काही मुलांशी बोलत होतो सुट्टीपुर्वी माझ्या वर्गात आम्ही मुलांकडून टोप्या करून घेतलेल्या. पलीकडे एक मुलगी तिच्या मैत्रिणीला टोप्या करायला शिकवत होती. सकाळपासून काहीही न बोललेली हि मुलगी. मी तिच्या जवळ जाऊन बोलण्याचा प्रयत्न केला तर तिथून पळूनच गेली.पण त्यांना शिबीर आवडत होते हे तरी कळले!Centrifugal Force समजावून घेताना घातलेल्या फुगड्या तर त्यांना मना पासून आवडल्या .
प्रत्येक गावात आम्ही स्थानिक लोकांच्या घरी राहिलो . विस्वेमा गावात अंगामी जमात राहते . हे गाव तसं फुटीर'वादी विचारसरणीचं नेतृत्व करणारं, NSCN -IM चा सचिव मुईवा ला जेंव्हा मणिपूर सरकारने प्रवेश नाकारला होता तेंव्हा त्याला विस्वेमा गावानेच आश्रय दिला होता. पण आता या गावाने देखील विज्ञानाचं महत्व ओळखलंय . रिंगमा जमातीच्या तेसोफेन्यू गावात जनित्र जळल्यामुले २ महिने वीज नव्हती , पण गावातील व्यवहार छान सुरळीत चालू होते . आपल्या प्रमाणेच कापणी नंतर गावात छोटे उत्सव साजरे होतात. प्रत्येक गावात एकाच जमातीची लोक छोट्या छोट्या वस्त्यामध्ये राहतात , प्रत्येक वस्तीचा प्रमुख गाव-सभेचा (village council ) चा सदस्य असतो . आणि या सर्वांचा प्रमुख "गाव-बुडा " करतो . मोकोकचुंग ची आओ हि Nagaland ची सर्वात पुढारलेली जमात, त्यांनी तर आमची व्यवस्था टुमदार चर्च मध्ये केली होती . गेली ३०~३५ वर्ष Nagaland चा मुख्यमंत्री या जमातीचा आहे , त्यामुळे वीज , रस्ते अश्या सगळ्या सोयी गावात पोचल्या . ये थील शिबिरात तर मुलांकडून प्रश्न देखील आले.
प्रशासकीय अधिकार्यांच्या भेटीतून nagaland च वास्तव समोर आलं. महात्मा गांधींच "ग्राम स्वराज्याचं " स्वप्न Nagaland ने पूर्ण केलय. गावातील सगळे निर्णय village council च घेते. कुणालाही कागदी घोडे नाचवत राजधानी कोहिमाला जायची गरज पडत नाही . प्रत्येक घराला जंगल कटाई च क्षेत्र ठरवून दिलं जात आणि त्याबाहेर कटाई केल्यास दंड भरावा लागतो , धान्याची कोठार एकत्र उभी केली जातात .ब्रिटीशांनी १९२० ला स्वतंत्र Nagaland ची बीज रोवली , त्यानंतर गोलमेज परिषदे मध्ये स्वतंत्र प्रतिनिधित्व , वेगळी शासकीय रचना या माध्यमातून त्याला खतपाणीचं घातल . स्वातंत्र्य प्राप्ती नंतर "नागलीम" ची मागणी करणाऱ्या NNC , NSCN-IM ,NSCN-K अश्या संघटना उदयाला आल्या .पुर्वांचलात आज फोफावलेल्या विघटनवादाची सुरुवात येथूनच झाली . म्यानमार , अरुणाचल व मिझोरम चा काही भाग असा मिळून स्वतंत्र नागा देशाची मागणी केली जाते .१९८० पासून NSCN चे स्वतःचे फेडरल प्रशासन आहे . स्वतःचा पंतप्रधान व मंत्रिमंडळ आहे. या शासनातर्फे कर वसुली सुद्धा केली जाते. शासकीय कर्मचार्यांना देखील हा कर चुकत नाही . त्यांच्या सशस्त्र लढ्यात सामान्य माणूस होरपळून निघाला . सामान्य माणसावर शस्त्र न उचलण्याच धोरण या संघटनांनी नंतर पाळल नाही. त्यांना असहकाराची शिक्षा मृत्यू , आणि त्यांना सहकार्य करणार्यांना सैन्याच्या रोषाला समोर जाव लागत.सरकार ने १९९७ ला सर्वांसोबत शस्त्र संधी केली . तेंव्हा पासून वरवर ची शांतता आहे.
महाभारतात उल्लेख असलेल्या हिडींबा आणि उलूपी या Nagaland च्या , पण सामान्य नागाला त्याच्या विषयी कल्पना नाही . जुन्या परंपरा या राक्षसी होत्या त्या बंद करायलाच हव्यात असं त्यांच्या मनात खोल बिंबवल गेलंय. दिल्लीविषयी रोष त्यांच्या मनात भरावा अश्या घटना अजून घडत असतात . नुकतेच चीन चे पंत प्रधान दिल्ली मध्ये आले होते . त्यांच्या समोर होणारी तिबेट च्या नागरिकांची नीदर्शन थांबवा असा आदेश पोलिसांना मिळाला. दिल्ली पोलिसांनी तिबेटी समजून अनेक नागा विद्यार्थ्यांकडे पासपोर्ट मागितला . अश्या घटनांचे दूरगामी परिणाम होतात .
आपल्याला लाजवेल असा नागा माणसाचं आदरतिथ्य आहे . सुरुवातीला स्वताच्या कोशात वावरणाऱ्या नागांनी आम्हाला त्यांच्या नाग महोत्वाच आमंत्रण दिलंय .सामान्य माणसाला आता शांततेची ओढ लागलीय .त्या छोट्या गावांमध्ये जर आपण विद्यान पोचवू शकलो तर फुटीरतावादी चळवळी पुन्हा डोक वर काढू शकणार नाहीत . आपण गेले वर्षभर "युरेका " विद्यान मासिक चालवत आहोत, ईशान्येच्या सात राज्यातील १५० शाळांमध्ये मध्ये हे मासिक विनामूल्य पोचवले जाते . तुम्ही देखील या मासिकात लेख लिहू शकता . विज्ञान वां इतर विषयां वरची शिबीर घ्यायची तुमची तयारी असेल तर Nagaland ची छोटी गावं तुमची वाट पाहत आहेत .

No comments:
Post a Comment