Wednesday, January 29, 2014
स्व अभ्यासाची सूत्रे
स्वाध्याय एक
:
डॉ. लुईस लीके जीवाश्म आणि मानववंश शास्त्राचा अभ्यास करणारे संशोधक आफ्क्रिकेत
काम करत होते. त्यांनी एक नवीन विषय अभ्यासासाठी घ्यायचे ठरवले. आफ्रिकेत गोरिला ,
ओरन्गउट्टाण, चिम्पान्झी या कपि प्रकारची वानरे सापडतात. मानवाला जवळचे असणारया चिम्पान्झीचा
अभ्यास करायचे त्यांनी ठरवले.अभ्यासासाठी त्यांनी विद्यार्थी निवडायचे ठरवले . या
विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती देण्यात येणार होती. मुलाखतीसाठी अनेक विद्यार्थी आले
होते . कोणी प्राणीशास्त्रात पदवी मिळवली होती, काहीजण संशोधन करत होते . या
मुलाखतीसाठी एक मुलगी आली होती . तिने प्राणीशास्त्रात पदवी देखील मिळवली नव्हती
तरी डॉ. लुईस यांनी तिची अभ्यासासाठी निवड केली . पुढे ती मुलगी आफ्रिकेतील घनदाट
जंगलात राहिली , नव्हे चिम्पान्झीन्बरोबर राहिली. तिने चिम्पान्झीन्बद्दल
आश्चर्यकारक माहिती जगासमोर आणील. गेली पन्नास वर्ष ‘जेन व्हान लाविक गुडल ‘ चिम्पान्झींचा
अभ्यास करत आहे. आज जेन चिम्पान्झीसाठी अभयारण्य निर्माण करत आहे. जेनाने
चिम्पान्झींचा अभ्यास कसा केला , आफ्रिकेच्या घनदाट जंगलातून ती कशी हिंडली , जंगल
वाचायला कशी शिकली , जीवावर बेतणाऱ्या प्रसंगांना कशी सामोरी गेली याची सविस्तर कथा
नँशनल जिओग्राफीक मासिका वा चँनलच्या वेब साईट वर जाऊन सविस्तार वाचा. जेनला
जेव्हा तिच्या संशोधनाबद्दल प्रसिद्धी मिळाली तेव्हा डॉ. लुईसना जेनची अभ्यासासाठी
निवड का केली असे विचारले असता डॉ. लुईस म्हणाले की जेनचे प्राणीशास्त्राचे ज्ञान
इतर विद्यार्थां पेक्षा कमी होते पण मला जेनमधील प्राण्याबद्दलची आवड ,
प्राण्याबद्दलचे प्रेम दिसून आले म्हणून जेनची चिम्पान्झींचा अभ्यास करण्यासाठी
निवड केली. जेन लिहिते ‘ मला लहानपणापासून निसर्गात मुक्त आवस्थे प्राणी कसे
राहतात , कसे जगतात याबद्दल कुतूहल होते. त्याच्या जीवनाची माहिती मिळवण्यासाठी
अभ्यास करण्याची माझी तयारी होती. चिम्पान्झी माझ्याशी बोलतील ऐव्हडे त्यांच्या
जवळ जाण्याची माझी इच्छा होती.’
मित्रांनो , आपण जेव्हा अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा प्रथम त्या अभ्यास
विषयाबद्दल आपल्या मानत प्रेम पाहिजे ,आवड पाहिजे तरच अभ्यासाला सुरुवात होते
.आपल्या आवडीचा विषय शोधता आला पाहिजे . आवड शोधण्यासाठी अनेक विषयांचा अभ्यास
करून बघावा लागेल . अनेक विषयांचा परिचय
होइल तेव्हा मनापासून आपण अभ्यास करु शकू असा विषय सापडेल . अभ्यासाची इच्छा /उत्सुकता/गरज आपल्या मनामध्ये आपणच निर्माण करायाल हवी तरच
अभ्यासाला सुरुवात होते . आईवडील ,शिक्षकांनी सांगितले म्हणून तुम्ही अभ्यास करता
का मला अभ्यास करायची इच्छा आहे , मला विषय आवडतो म्हणून मी अभ्यास करतो हे अभ्यास
करताना सर्वात महत्वाचे आहे.
स्वतःच्या इच्छेने अभ्यासाला सुरुवात केलीत तर
अभ्यासाचे तंत्रमंत्र तुम्हाला सांगता येतील ;नव्हे एकलव्याप्रमाणे तुम्हीच ते
शोधून काढाल .
स्वाध्याय दोन
:
मित्रानो ,
कधीतरी सिंहगडावर जाऊन आला असालना, पायी गड चढताना चांगलेच दमायला होतेना ! पण पण
मजा येते.माझ्या सोलापूरच्या शाळेतील विद्यार्थांच्या चेहऱ्यावर तर सिंहगड ,राजगड
चढाई केल्यावर एव्हरेस्ट चढाई केल्याचा भाव असतो.
एकदा पुण्यात
सलग सिंहगड चढण्याची स्पर्धा योजली होती . पुण्यातील अनेक युवक त्या स्पर्धेची
कसून तयारी सराव करत होते. वर्तमान पत्रातील स्पर्धेची बातमी वाचून पुण्यात
शिकायला आलेला अरुणाचल प्रदेशातील मित्र ‘ताकेलूम’ गंमत म्हणून स्पर्धा पाहण्यासाठी गेला . सिंहगडचा
पायथ्याशी गेल्यावर गंम्मत म्हणून ताकेलूमने स्पर्धकांबरोबर सिंहगड चढायल उतरायला
सुरुवात केली . आश्चर्य मंजे सराव केलेले स्पर्धक थकून बाद झाले पण ताकेलूमने
सिंहगड सलग चढण्याची स्पर्धा जिंकली . विक्रम त्यांवर नोंदवला गेला व लिम्का बुक
ऑफ रेकॉर्ड्स मध्ये त्याचे नाव नोडवले गेले.
गेल्या वर्षी
मे महिन्यात मी अरुणाचल प्रदेश मध्ये गेलो होतो . तेथील एका दुर्गम खेड्यातील
मुलगी
‘टिने
मेना’ एवरेस्टवर चढाई करून आली होती.
माझे
सोलापूरच्या शाळेतील विद्यार्थी , ताकेलूम आणि टिने मेना यांच्यात तुम्हाला काय साम्य फरक जाणवतो ? सर्वांच्या जन्मजात शारीरिक क्षमता
समान आहेत पण ताकेलूम आणि टिने मेना
अरुणाचल सारख्या हिमालयातील पहाडात राहिल्याने त्यांच्या डोंगर चढण्या साठीच्या
क्षमता सोलापुरसारख्या सपाट मैदानी क्षेत्रात राहणार्यांपेक्षा विकसित झाल्या
आहेत.
आपण ज्या
नैसर्गिक, कौटुंबिक व सांस्कृतिक
वातावरणात राहतो त्याप्रमाणे आपल्या काही क्षमता व कौशल्ये परिसराच्या संसारामुळे
नकळत विकसित होतात. ज्याच्या घरी वाचनाचे वातावरण आसते त्याचे वाचन चांगले
असते किमान ती बहुश्रुत असतात , ज्यांच्या
घरी दुरुस्ती देखभालीचे काम चालेते त्याला दुरुस्तीचे ज्ञान सहज होते, घरचे दुकान असेल तर त्याचे संवाद कौशल्य अपसूक
विकसित होते.
आता ताकेलूम एव्हरेस्टवर
का जाऊ शकला नाही आणि टिने मेना एव्हरेस्टवर
का सर करू शकली याचा विचार करू . दोघेही पहाडात राहणारे एकाच प्रदेशातील आहेत , पार्श्वभूमी
समान आहे पण डोंगरात राहतो म्हणून डोंगर चढणे आणि एवरेस्ट चढणे यात फरक आहे .
गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घ्यावे लागते,
नियमित सराव करावा लागतो. मनात पराक्रम करण्याची इच्छ्या प्रथम असावी लागते ,
त्याला प्रशिक्षण ; कौशल्य विकसन व सरावाची जोड द्यावी लागते.
मित्रांनो,
अभ्यास करण्यासाठी नुसते हुशार असून भागात नाही तर प्रथम अभ्यासाची इछ्या/आवड असावी लागते . नुसती आवड असून भागात नाही तर
अभ्यास कसा करायचा याचे तंत्रमंत्राचे अवगत व्हावे लागतात त्याचा सराव करावा
लागतो. असा अभ्यास कसा करायचा याचे प्रशिक्षण घेऊन जो सराव करतो तोच परीक्षेचा एव्हरेस्ट
सर करून यश मिळवू शकतो.
अभ्यासाचे तंत्रमंत्र जाणून घेतल्याने तुम्ही अभ्यासातील अडथळे
दूर करून अभ्यासाची परिणामकारकता वाढवू शकाल.
स्वाध्याय तीन
:
स्वाध्याय एक
आणि दोन मध्ये स्वयं अध्ययनातील ‘ स्व’ चा विचार आपण केला . स्वाध्याय तीन मध्ये
अभ्यासाचा एव्हरेस्ट चढण्याचा निश्चय
झाल्यावर काय करायचे याचा विचार करू.
मित्रांनो,
तुम्ही एकविसाव्या शतकामध्ये शिकत असणारे विद्यार्थी आहात. संगणक , इंटरनेट सारखी
साधने तुम्हाला अभ्यासासाठी उपलब्ध होत आहेत. ज्ञानाच्या कशा विस्तारत आहेत ,
इंटरनेट च्या माध्यमातून माहिती सहज उपलब्ध होत आहे. पण प्रगतीची गती दिवसेंदिवस
वेगवान होत चालली आहे . अश्यावेळी शिकण्याचा अर्थ समजून घेऊन शिकणारेच पुढे जातील.
महत्व येणार आहे किती पाठ आहे यालानाही तर माहितीवर प्रक्रिया करता येतेकी नाही
याला . महत्व येणार आहे ते किती समजले,समजलेले वापरता येणे व
प्रश्न सोडवता येणे याला . शाळेतील शिक्षकांपलीकडचे मार्गदर्शक आपल्याला
उपलब्ध झाले आहेत . त्यामुळे नियोजन बद्ध अभ्यास करण्या साठी ‘ शिकायचे कसे ते
शिकण्याचे’ (Learning to learn) महत्त्व वाढत जाणार आहे. त्यासाठी ‘स्वयं अध्ययन
कौशल्ये’ शिकणे महत्वाचे आहे.
तुम्ही अभ्यास
करता म्हणजे काय करता ? एखादी संकल्पना
तुम्हाला समजली आहे हे तुम्हाला कधी व कसे समजते ? शाळेत , क्लासमध्ये तुम्ही
शिकता , पाठ्य पुस्तके वाचता , तयार नोट्स, गाईड, नवनीत वाचता , प्रश्नोत्तरे घोकं
पट्टी करून; पाठ करून परीक्षेत लिहिता आणि गुणही मिळवता. पण एवढे करणे म्हणजे
परिपूर्ण अभ्यास करणे नाही. कदाचित शालेय वयात हि पद्दत परीक्षेत उत्तीर्ण
होण्यासाठी उपयोगी पडेल पण महाविद्यालयात आणि विद्यापिठात उच्य शिक्षण घेण्यासाठी
हि पद्धत कुचकामी ठरेल म्हणूनच स्वतचे स्वतः शिकण्याची हि ‘ स्वयं अध्ययनाची ‘रीत
, त्यातील कौशलये व तंत्रे समजून घायला हवीत.
अभ्यास
कौशल्ये :
चांगला अभ्यास
करण्यासाठी चांगले वाचन करता येणे आवश्यक आहे म्हणजे तुमची वाचनाची गती उत्तम असायलाच हवी पण तुमची
समज पण उत्तम असायला हवी. अभ्यासासाठी वाचन, लेखन , निरीक्षण , श्रवण, स्मरण ,
पाठांतर , टिपणे (नोट्स) काढणे यासारखी कौशल्ये शिकावी लागतील .
माहिती
कौशल्ये :
माहितीच्या
युगात माहित शोधता येणे व माहितीवर प्रक्रिया करता येणे महत्वाचे आहे. शब्दकोष
;ज्ञानकोश ; विश्वकोश वापरता येणे ,ग्रंथालयात संदर्भ शोधता येणे महत्वाचे आहे.
इंटरनेट वर माहित , चांगल्या वेब साईट शोधता येणे , माहिती साठवता येणे , चांगल्या
मित्रांच्या ;अभ्यासकांच्या गटाच्या
संपर्कात राहणे ,त्याचे सभासद बनणे.
अभ्यास
पायऱ्या :
एखादी
संकल्पना समजून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिता येणे व पैकीच्या पैकी गुण
मिळवण्यासाठी अभ्यास टप्याटप्याने करावा लागतो. प्रथम विषयाचे व परीक्षेचे स्वरूप
जाणून घ्या (survey), विषय उत्तम समजण्यासाठी जास्तीजास्त प्रश्न विचारा (Questioning & understanding) ,
त्यासंकल्पानेबद्दल जे जे साहित्य संदर्भ उपलब्ध असेल ते मिळावा व वाचा (reading),
वाचनानंतर त्याची टिपणे काढा ,टिपणातील सारशब्द शोधून सूक्शम टिपणे; तक्ते
,संकल्पना चित्रे तर करा (writing &information processing ), महत्वाची माहित
स्मरणात ठेवा (remember), स्मरण केलेले ;पाठ केलेले आठवण्याचा सराव करा (recall) ,
उजळणी करा (revision), प्रश्न प्रकारानुसार परीक्षेत उत्तारची मांडणी कशी करणार ते
निश्चित करा आणि प्रश्न पत्रिका सोडवण्याचा सराव करा (representation).
वरील SQ5R या
पाच पायरयातून संकल्पनेचा प्रवास झाला तर परीक्षेतील यश तुमच्या पदरात नक्की पडेल.
नियोजन :
इंग्लिशमध्ये ऐक विचार आहे “ If you fail to
plan you plan to fail”. अभ्यास आपण विशिष्ट हेतू डोळ्या समोर ठेऊन करत असतो .
त्यामुळे नियोजनाची पहिली पायरी म्हणजे हेतू /उद्दिष्ट नेमक्या शब्दात मांडणे.
उद्दिष्ट ठरवले तर उद्दिष्ट सध्या करण्याच्या प्रेरणेने अभ्यास जोमाने होइल.नेमके ,
मोजता येणारे , आव्हानात्मक उद्दिष्ट ठरवावे. त्याचे टप्पे मांडावेत म्हणजे
नियोजित उद्दिष्टाच्या दिशेने प्रयत्न केले जातील. उद्दिष्टा पर्यंत पोचण्यासाठी
त्याला वेळेच्या नियोजनाची व अभ्यासासाठी लागणाऱ्या साधनांच्या नियोजनाची जोड
द्यावी लागेल. साधनाच्या नियोजनात पुस्तके , अभ्यास साहित्य , अभ्यास मार्गदर्शक , खर्च आदीचा विचार करावा .
वेळेच्या नियोजन करता येणे व ते पाळता येणे
सर्वात महत्वाचे . शाळेचे वेळापत्रक, अभ्यासक्रम ,घराचे कार्यक्रम ,सन समारंभ , आपले छंद आदींचा
विचार करून वार्षिक/सत्र/मासिक/ नियोजन , साप्ताहिक नियोजन व दैनंदिन नियोजन असा
विचार करावा . नियोजन लवचिक तरीही उद्दिष्टाकडे नेणारे असावे.
‘स्व’ नियोजन
:
अभ्यासाची परिणाम
कारकता सर्वाधिक कशावर अवलंबून असेल तर
‘स्व’ नियोजनावर. ‘स्व’ नियोजनासाठी आधी स्वतःच्या क्षमता ;मर्यादांचे
भान,जबाबदारीची जाणीव निर्माण झाली पाहिजे. आपले आवडते विषय; नावडते विषय , आपली
अभ्यासाची शैली , आपल्या अभ्यास सवई माहित होणे गरजेचे आहे. ‘स्व’ नियोजनात आपल्या परिसरातील बह्याघटकांचे
नियोजन जसे अभ्यासाची जागा, टीव्ही करमणुकीसाठी कितीवेळ देणार , टाईम पास
/गप्पासाठी कितीवेळ आदीचा विचार केला पाहिजे. अभ्यासाची
परिणाम कारकता वाढवण्यासाठी निरोगी शरीर , युक्त आहार विहार, विश्रांती, झोप महत्वाचे आहेत. दिवसाच्या
सुरुवातीला दिवसातील कामे , आपल्या
अभ्यासाची गुणवत्ता याबद्दल चिंतन करण्यासाठी ५ मिनिटाचा वेळ ध्यानासाठी
/चिंतनासाठी राखून ठेवावा. शांतजागी ,प्रसन्ना वातावरणात स्वस्थ बसून स्वतःच्या
उद्दिष्टान्बद्दल ,प्रगतीबद्दल स्वतःशीच बोलावे, संवाद करावा.
_------------------------------------------------------------------------------------------------------------------
अभ्यासातील स्वावलम्बनातून यशाचा वेध घ्याचा
असेल तर वरील तीन स्वाध्यायावर चिंतन करा .
अभ्यासाची विविध कौशल्ये ,तंत्रे व
पद्धती यांचा परीचय करुन घ्या , त्यांचा
सराव करून त्यावर प्रभुत्व मिळावा .
अभ्यास करताना ऐक विचार सतत समोर ठेवा ‘Start
where you are ,with what you have ,Make some thing of it and never be
satisfied.’
मनापासून नियोजन पूर्वक अभ्यास करून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे
जा .
यश तुमचेच आहे.
Subscribe to:
Comments (Atom)





