Friday, September 20, 2013

good links

Dear Prashant,

Here is a link to the video on the Majuli School where Ravi worked.

In the Land of Satra - Majuli   http://youtu.be/04uIhzVmB-U 

Apte

 Good Article


The Beautiful River or The Battleground?
http://sandrp.wordpress.com/2013/07/17/brahmaputra-the-beautiful-river-or-the-battleground/

Saturday, September 7, 2013

महाराष्ट्रातील शिक्षकाचे भगीरथ प्रयत्न

 विवेकानंद केंद्र विद्यालय ,दिब्रुगड चे प्राचार्य श्री.रवी सावदेकर यांचावर शिक्षक दिनानिमित्त महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेले सदर खाली देता आहे. आमच्या माजुली भेटीच्या वेळची दोन छायाचित्रे सोबत जोडली आहेत. 
प्रशांत

महाराष्ट्रातील शिक्षकाचे भगीरथ प्रयत्न 



आज शिक्षक दिन

नीरज पंडित , मुंबई 

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/--/articleshow/22306394.cms?#write

शाळा उभारण्याचे काम हे अवघडच ; त्यातही ती आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीजवळच्या एका बेटावर उभारणे हे तर दिव्य काम ! पण प्रचंड जिद्द आणि अपार इच्छाशक्तीच्या जोरावर रवींद्रनाथ सावड्येकर यांनी हे काम शक्य करून दाखवले . त्यांनी उभारलेल्या शाळेत आज शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असून सावड्येकरांच्या या कार्यामुळे आसामच्या एका छोट्याशा बेटावरील विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी दिशा मिळाली आहे .

स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या रवींद्रनाथ यांनी सटाणा येथे आपले एमएससीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर विवेकानंद केंद्रातील शिक्षण विभागात काम सुरू केले . त्यांना हे काम इतके आवडले की स्वतःहून अनेक उपक्रम हाती घेणे त्यांनी सुरू केले . त्यांची इच्छाशक्ती आणि जिद्द पाहून विवेकानंद केंद्राने त्यांना आसाम येथे ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातल्या माजुली बेटावर शाळा उभारण्याची जबाबदारी दिली .

भाड्याने घेतलेल्या एका मातीच्या खोलीत १७ जून २००२मध्ये या बेटावरची पहिलीवहिली सीबीएसईची शाळा सुरू झाली . शाळेत अवघे ५३ विद्यार्थी होते . बेटावरील गावात शाळेची इमारत उभारणे मोठे आव्हान होते . अनेक भौगोलिक तसेच सांस्कृतिक अडचणी पार केल्यानंतर बेटावर शाळेची पक्की इमारत उभी राहिली . आज दहा वर्षांनंतर या शाळेत पाचशेच्यावर विद्यार्थी शिक्षण घेत असून येथे ५० विद्यार्थ्यांना राहता येईल , असे हॉस्टेलही उभारण्यात आले आहे .

माजुली बेटावर उभे राहिले विद्येचे मंदिर

ब्रह्मपुत्रा नदीखोऱ्याजवळचे माजुली बेट बांधकामांसाठी अत्यंत अवघड असेच होते . बेटावर गाळ असल्याने तेथे पक्की बांधकामे जवळजवळ नव्हतीच . पण या बेटावर शिक्षण प्रसाराचे आव्हान स्वीकारलेल्या रवींद्रनाथ सावड्येकरांनी अरुणाचल प्रदेशातून खडीसाठी दगड मागवले . ते फोडण्यासाठी कारागीर आणले आणि अथक प्रयत्नांनंतर बेटावर विद्येचे मंदिर उभे केले .

शाळेची पक्की इमारत बांधायची असेल बांधकामात खडी वापरणे आवश्यक होते . पण , बेटावर बांधकाम करणाऱ्यांनी खडी मिळणार नाहीत , असे स्पष्ट सांगितले . अरुणाचल प्रदेशमधून खडी आणण्याचे ठरले . पण , छोटी खडी आणणे त्रासदायक असल्याने बोटींमधून मोठे दगड आणले . बेटावरील कारागिरांना खडी फोडण्याचा अनुभव नसल्यामुळे ती फोडण्यासाठी ३०० किमी अंतरावरून कारागीर मागविले आणि माजुली बेटावर खडी आणि सिमेंटने तयार केलेली पहिली इमारत उभी राहिली .

आसाममधील हे बेट सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जात असले तरी तेथे म्हणावा तसा विकास होत नव्हता . मिशिंग जमातीमधील विद्यार्थ्यांना शाळेत आणणे हे आव्हान होते . तेही त्यांनी पेलले . शाळेचे व्यवस्थापन स्थानिक लोकांची समिती आणि विवेकानंद केंद्र सांभाळत असून शाळेतील मुलांनी राष्ट्रीय पातळीपर्यंतच्या विविध स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे . रवींद्रनाथ सध्या दिब्रुगड येथील विवेकानंद केंद्राच्या शाळेत मुख्याध्यापक आहेत