Tuesday, December 25, 2012

बॉर्न फ्री .....लिव्हींग फ्री .......फ्री फॉर एव्हर



बॉर्न  फ्री .....लिव्हींग फ्री .......फ्री फॉर एव्हर

        माझ्या आवडत्या कादंबरी पैकी एक आणि सिनेमांपैकी एकबॉर्न फ्री’. आफ्रीकेच्या जंगलात जोय् आणि जॉर्ज अॅडमसन या कुटुंबाने एल्सा या अनाथ सिंहिणीला कसे वाढवले याची कथा आहे. जॉर्जला एकदा जंगलात हिंडताना ३ सिंहाचे बछडे सापडले. जॉर्ज त्यांना घेऊन त्याच्या कॅम्पवर आला. कालांतराने यातील दोन बछड्यांची प्राणी संग्रहालयात रवानगी करण्यात आली. पण छोटी एल्सा मात्र जोय् आणि जॉर्ज बरोबर राहिली. एल्सा मोठी झाल्यावर अशा काही घटना घडल्या कि एल्साला एकतर जंगलात सोडणे किंवा तिची प्राणी संग्रहालयात रवानगी करणे असे दोनच पर्याय जोय् आणि जॉर्ज समोर जंगल खात्यामार्फत ठेवले जातात . जंगलात एल्साचे पुनर्वसन करणे अवघड काम असते पण जोय् आणि जॉर्ज हाच पर्याय स्वीकारतात. बंदिस्त पिंजऱ्यात  एल्साला न पाठवता  तिला पुन्हा जंगलात स्वतंत्र करण्याचे ठरवतात. या प्रयत्नासाठी त्यांना ३ महिन्यांची मुदत मिळते . जोय् आणि जॉर्जबरोबर राहून एल्सा माणसाळलेली असते. तिला शिकार करता येत नसते ना न सोललेला प्राणी खाता येत असतो.  अशा परिस्थितीत एल्साचे तीन महिन्यात जंगलात पुनर्वसन करण्यासाठी जोय् आणि जॉर्ज काय काय प्रयत्न करतात हे सांगणारा हा चित्रपट आहे. 


        चित्रपटात एक प्रसंग आहे , एल्साला जंगलाची ओळख व्हावी म्हणून जोय् आणि  जॉर्ज तिला जंगलात सोडतात , जंगलात तिला चिखलात डुंबणारे रानडुक्कर दिसते . एल्सा त्याच्या जवळ जाते. एक सिंहिण जवळ येते आहे हे पाहून डुक्कर बिचकते व दोन पावले दूर पळते . एल्सा पुन्हा त्याच्या जवळ जाते व त्याला गोंजारते . ते पुन्हा दूर पळते. असे दोनतीनदा घडते ....आणि मग ते  रानडुक्कर या सिंहिणीचे पाणी ओळखते आणि एल्सा जवळ आल्यावर तीला  मुसंडी देते . रानडुक्कर एल्साला मुसंडया देऊन घायाळ करत असते पण एल्सा परत परत त्याच्या जवळ जात असते. त्याच्यावर हल्ला करायचे तिचे भान हरवलेले असते कारण जोय् आणि जॉर्ज बरोबर राहताना ती इतर प्राण्यांबरोबर खेळीमेळीने राहत असते. एल्साची शिकार करण्याची नैसर्गिक प्रेरणा हरवलेली असते. 

         हा प्रसंग पहात असताना मला इसापनीती आणि पंचतंत्रातील वाघाची आणि गरुडाची गोष्ट आठवते. शेळयां बरोबर रहाताना वाघ आपली डरकाळीच विसरलेला असतो आणि कोंबड्यांबरोबर राहताना गरुडाचे पिल्लू आपल्या पंखांची ताकद कोंबड्यां एवढीच समजत असतो. कथा सविस्तर सांगत नाही तुम्ही पूर्वी ऐकली किंवा वाचली असेल. ......... आपण पण बरेचदा एल्सा सारखे किंवा त्या वाघ किंवा गरुडासारखे वागतो.  आपण आपल्या नैसर्गीक क्षमतांचा शोध घेत नाही. आपल्या बरोबर जे असतात त्यांच्या  क्षमतांबरोबर तुलना करून आपण त्यांच्या जवळ किंवा त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो पण स्वतःच्या क्षमता शोधण्याचा प्रयत्न करत नाही. आपल्या सभोवतालचे वातावरण , पालकांच्या इच्छा आकांक्षा यात गुर्फटल्याने मला काय आवडते ....मला काय जमते ..काय जमत नाही यासाठीचा विचार करणे व अनुभव घेणे राहून जाते. स्वतःचे मूळ स्वरूप विसरते,लोप पावते व इतररांच्या कल्पनेतील 'मी' घडत जातो. 


       आपली अवस्था माणसाळलेल्या एल्सासारखी होते. कायम आयते सोललेले मांस खाल्याने तिला प्राणी सोलून खाता येत नाही व शिकार करायची असते ही प्रेरणा ती विसरून गेलेली असते. पालक लाडाने शाळेत गाडीने सोडतात आणि नंतर आपण किती सायकल चालवू शकू हे स्वतःलाच माहित नसल्याने सायकलने शाळेत येण्याचे टाळतो  ( सायकल चालवू दमलो तर अभ्यासावर परिणाम होईल ना ‌!! ) हे शारिरीक क्षमतेबद्दलचे तर इतर क्षमता ओळखणे तर अजून अवघड आहे. स्वतःची ओळख होण्यासाठी अनेक अनुभव घेतले पाहिजेत अनेक कृती करून पहिल्या पाहिजेत.

             एल्सा जंगलात शिकार करणे आणि स्वतःचे अस्तित्व टिकवण्या एवढी सक्षम झाल्यावर  जोय् आणि  जॉर्ज एल्साला सोडून इंग्लंडला निघून जातात. वर्षभराने एल्सा जंगलात टिकली असेल ? ; रुळली असेल ? या आशेवर जोय् आणि  जॉर्ज केनियाला परत येतात . त्यांना एल्सा सापडते , ती त्यांची ओळख विसरलेली नसते आणि ... आता ऐल्सा तीन छाव्यांची आई झालेली असते. सिंहिण म्हणून एल्साने स्वतःला शोधलेले असते. वर्षभरातील जंगलातील वास्तव्य, निसर्ग आणि परिस्थितीने एल्सातील सिंहित्व आता पूर्ण विकसित झालेले असते.

           आपल्याला पण बरेचदा आपल्या क्षमता विशेष प्रसंगांमुळे , परिस्थितीला सामोरे जाताना माहित होतात . विकासाची ही पद्धत नैसर्गिक आहे. पण माणूस स्वतःमध्ये ठरवून जाणीव पूर्वक बदल घडवून आणू शकतो. त्यासाठी स्वतःला शोधणे गरजेचे आहे. तरच आपल्यातील  ‘ मनुषत्वविकसित होऊ शकेल. स्वामी विवेकानंद म्हणतात  त्या प्रमाणे आपल्यात ते मनुषत्व ,,,,ते पूर्णत्व आहेच पण ते उलगडण्यासाठी ;उकलण्यासाठी आपण जाणीव पूर्वक प्रयत्न केले पाहिजेत.
कादंबरीत एल्सा आणि तिच्या पिल्लांची कथा सांगताना जॉर्ज एके ठिकाणी लिहितो
                My heart was with them wherever they were. But it was also with these two lions here in front of us; and as I watched this beautiful pair, I realized how all the characteristics of our cubs were inherent in them. Indeed, in every lion I saw during our searches I recognized the intrinsic nature of Elsa, Jespah, Gopa and Little Elsa, the spirit of all the magnificent lions in Africa"
 

            हेच आपल्यातील स्पिरीट शोधणे म्हणजे बॉर्न  फ्री .................लिव्हींग फ्रीहा प्रवास होय. 

 बॉर्न  फ्री ही कादंबरी एल्साचा प्रवास सांगते . बॉर्न फ्री चे दोन पुढील भाग आहेत ... लिव्हींग फ्रीआणि ... फ्री फॅार एव्हर’. लिव्हींग फ्री म्हणजे काय आणि तिथून फ्री फॅार एव्हरया प्रवासाबद्दल परत कधीतरी जाणून घेऊ. 

 ( प्रशांत दिवेकर . जुलै  २०१२ ,ज्ञान प्रबोधिनी प्रशाला , पुणे  उपासनेनंतरचे प्रगट चिंतन )
 




Wednesday, December 19, 2012

Update : Science camp : Bachapan Banao


 

 

 

IISER, Prabodhini to conduct science camp for Dantewada students from December 18

For details visit 

http://www.indianexpress.com/news/iiser-prabodhini-to-conduct-science-camp-for-dantewada-students-from-december-18/1045019/0 

 

Monday, December 17, 2012

Vivekananda Kendra's work in Northeast

Vivekananda Kendra's work in Northeast

The Northeast region is considered the crown of Bharat and Arunachal Pradesh its crest jewel and therefore it is vulnerable to the evil designs of forces inimical to India. Bharat Ideal Social Order is a unique one and its preservation, protection and promotion is a prime necessity. This Ideal Social Order is still prevalent in living form in all the eight States of the Northeastern region. It is the responsibility of all patriotic citizens of this great land to contribute their time and energy for the purpose. Shri Eknath Ranade, founder of Vivekananda Kendra was therefore very particular that appropriate multi-dimensional activities should be undertaken here.
With this in view, Kendra is working in the region with the theme “Development through Culture. Kendra is at present having numerous active branch centres in Arunachal Pradesh, Assam and Nagaland and is slowly increasing its activities to the Northeastern States.

visit following sites to know about Vivekananda Kendra's work in Northeast India .

  http://www.vivekanandakendra.org/

Vivekananda Kendra Institute of Culture : http://www.vkic.org
Vivekanada Kendra ArunJyoti Project Website : http://www.vkarunjyoti.org
Vivekanada Kendra Project for in Arunachal : http://www.vkarunachal.org
Vivekanada Kendra Education Project for Arunachal Pradesh : http://www.vkvapt.org